छत्रपती शिवाजीराजे भोसले
अधिकारकाळ जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक जून ६, १६७४
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी
रायगड
पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
पदव्या गोब्राह्मणप्रतिपालक
जन्म फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड
उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील शहाजीराजे भोसले
आई जिजाबाई
पत्नी सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई
संतती छत्रपती संभाजीराजे भोसले,
छत्रपती राजारामराजे भोसले
राजघराणे भोसले
राजब्रीदवाक्य
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.
Friday, 20 February 2009
सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं
राखी रजपुती , रजधानी राखी राजन की
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं
भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं
साही के सपूत , सिवराज समशेर तेरी
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं
वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं
हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं
मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं
देवल गिराविते , फिराविते निसान अली
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी
गौर गणपती आप , औरनको देत ताप
आपनी ही बार सब , मारी गये दबकी
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी
- कविराज भूषण।
याचा अर्थ असा की हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले।हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}
सौजन्य अनामिका
शिव कविता
बाडव सुअंभपर !
रावण सदंभपर !
रघुकुल राज है !!
पौन वारिवाह पर !
संभु रतिनाह पर !
ज्यो सहसवाह पर !
राम द्विज राज है !
दावा दृमदंड पर !
चिता मृगझुंड पर !
भूषण वितुंड पर !
जैसे मृगराज है !!
तेज तमंअंस पर !
कन्न्ह जिमि कंस पर !
त्यों म्लेंच्छ बंस पर !
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
--कवीराज भूषण.
Thursday, 19 February 2009
गनिमी कावा म्हणजे काय?
शिवाजी महाराजंनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्रासे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे। 'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रुचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. प्रश्न असा उद्भवतो की 'शत्रूचा कपटयुक्त हल्ला' या शब्दाप्रयोगात शत्रू कोण?
मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या निदर्शनात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो। म्हणजे 'गनिमी कावा' ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दाप्रयोगात अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हे लक्षात घेता आपणही मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' असाच करतो आणि मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही!
मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ। मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!'' 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.
'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत। कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.
'महराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत। त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 2. लुच्चेगिरी, 3. गुप्तकट, 4. हुलकावणी आणि 5. पीछेहाट. 'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.
कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणार्या प्रशिक्षणाशी संबंधित आहे। पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते। तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो। मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणार्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता निरनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले.
(शिवकालीन राजनीती आणि रणनीती या पुस्तकातून साभार) - श्रीधर रंगनाथ कुलकर्णी
बहूजनांसी आधारू
पडिक जमिनीची मशागत करणार्या शेतकर्यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे। दलालांची प्रथा तर छत्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंना महसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत शिवरायांच्या कारकिर्दीतच सुरु झाली. दुष्काळाच्या काळात शिवकाळात शेतकर्यांना शेतसारा माफ करुन त्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला जात असे. शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नये, मोबदला दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असे कडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्यांना काढले होते. शेतकर्यांची आर्थिकस्थिती सुधारली तर देशाला संपन्नता येईल, असे मत राजेंचं होतं. म्हणूनच छत्रपती हे रयतेचा राजा म्हणून जनमानसात संबोधले गेले.
परस्त्रीप्रति आदर
स्त्री ही कुठलीही असो, प्रत्यक्ष शत्रुच्या मुलखातील जरी असली तरी ती अखेर मातेसमानच असते, असा विचार छत्रपतींनी रयतेला दिला। शत्रुच्या स्त्रियांना सन्मानाने वागवणारा शिवबा अशी जनमानसात त्यांची ख्याती होती. त्यांच्या कारकिर्दीत स्त्रियांना सैन्यापासून तसूभरही भय नसे. एक चारित्र्यसंपन्न राजा म्हणून त्यांची ओळख होती. परस्त्रीचा आदर-सन्मान करणे, हा आमचा राजधर्म आहे, असे हे म्हणत. स्त्रिचा अनादर केल्याबद्दल शिक्षा म्हणून शिवबांनी एका गावप्रमुखाचे हातपाय तोडण्याचे हुकूम बजावले होते. आबाजी सोनदेवने कल्याणच्या सुभेदारची सून महाराजांसमोर पेश केली असता, महाराजांनी लगेचच त्या स्त्रीला सन्मानपूर्वक घरी पोहोचविण्याचे आदेश जारी केले. परस्त्रीविषयी महाराजांच्या मनात नितांत आदर होता.
सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते
शिवकालीन इतिहासात देवळांप्रमाणे मशिदांनाही सरकारी तिजोरीतून अर्थसहाय्य देण्यात येत असे। शिवकालीन धर्म म्हणजे स्वराज्याचे व परंपरेचे रक्षण करुन, रयतेत आत्मविशवास व चैतन्य निर्माण करणे होय. मोहिमेवर असताना मुसलमानांच्या तसेच अन्य धर्मियांचे धर्मग्रंध व धर्मस्थळांचा आदर करावा, असा छत्रपतींचा सैन्यांना हुकूम असायचा. शिवरायांचे धार्मिक धोरण खर्या अर्थाने उदार होते. महाराजांच्या आरमारात दर्यासारंग दौलतखान, इब्राहिम खान सारखे अनेक मुस्लीम अधिकारी होते. इतकेच नव्हे तर, त्यांच्या लष्करात विविध पदांवर 700 हून अधिक पठान कार्यरत होते. राजधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म होय, असे ते म्हणत. युद्धभूमीवर सापडलेली कुराणाची प्रत त्यांनी मौलवीकडे सोपविण्याची घटना सर्वश्रुत आहे.
शिवबा हे एक चारित्र्यसंपन्न व परधर्माप्रति सहिष्णुता बाळगणारे राजे होते. उच्च पदावर नेमणूक करताना त्या व्यक्तिची जात-धर्म न पहाता देशप्रेम, राजाप्रती आदर, निष्ठा, युद्धनैपुण्य हे गुणवैशिष्टये परखूनच ते त्या व्यक्तीची नियुक्ती करित असत. सर्वधर्मसमभाव हा मूलमंत्र छत्रपतींनी आयुष्यभर जोपासला. त्याचबरोबर छत्रपतींनी धर्म व राजकारण याची फारकत करुन सर्वधर्मसमभावाची रयतेला शिकवण दिली.
रायगडाला जेव्हा जाग येते....
जेम्स डग्लस या इंग्रज अधिकार्याने शिवरायांच्या समाधीच्या उपेक्षेकडे लक्ष वेधले। १८८३ मध्ये त्याने रायगडाला भेट दिली। औरंगाजाबेच्या मोगली सत्तेशी टक्कर देऊन रयतेचे हिंदवी स्वराज्य उभारणार्या या मराठी राजाच्या समाधीच्या दुरवस्थेने तो इंग्रज अधिकारीही हेलावला. त्यावेळी रायगडावरील मंदिर भग्न झाले होते. महाराजांची मूर्तीची अवस्थाही चांगली नव्हती. त्याने आपल्या 'अ बुक ऑफ बॉम्बे' या पुस्तकांत ही अवस्था लिहिली. एक मोठे साम्राज्य उभारणार्या या राजाच्या समाधीसाठी आज साधा रूपयाही खर्च होत नाही. कुणी त्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशा शब्दांत त्याने तत्कालीन मराठी समाजाची लक्तरे काढली. एवढे करून डग्लस थांबला नाही. त्याने ब्रिटीश सरकारलाही या समाधीकडे लक्ष द्यायला सांगितले. भलेही शिवाजी महाराजांचे राज्य आज ब्रिटिशांच्या ताब्यात आले असले तरी तो एक मोठा राजा होता, याकडे त्याने लक्ष वेधले.
डग्लसचे प्रयत्न अगदीच वाया गेले नाहीत। समाधीची अवस्था कळाल्यानंतर तत्कालीन समाजातही संतापाची भावना उसळली। त्याचबरोबर राजांच्या देदिप्यमान पराक्रमानंतर वतनदारी, जमीनदारी उबवणार्या सरदार-दरकदारांवर ही चीड व्यक्त झाली. एकूणच प्रजेचा दबाव वाढू लागल्याने ब्रिटिश सरकारने पुरातत्व खात्याकडे या समाधीची व्यवस्था सोपवली.
पण हे केले ते ब्रिटिश सरकारने। शिवाजी महाराजा आपले राजे होते, त्यांच्यासाठी आपण काय केले ही भावना उरतेच। मग त्यावेळी महाराष्ट्रातील बुद्धिजीही एकत्र आले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत १८८६ मध्ये एक बैठक झाली. तीत अनेक मराठा सरदार, वतनदार आणि कोल्हापूर संस्थानचे प्रतिनिधीही उपस्थित होते. पण बैठका होऊनही काहीही ठोस असे झाले नाही. हे सगळे होत असताना इतर व्यापात गुंतलेले लोकमान्य टिळक काहीसे दूरच होते. मग काही वर्षांनी व्ही. एन. मंडलिक या गृहस्थांनी १८९५ मध्ये पुन्हा रायगडला भेट दिली, त्यावेळी समाधीची अवस्था फारशी बदलली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मग नेटिव्ह ओपिनियनमध्ये यासंदर्भात एक लेख लिहिला. त्यात डग्लसच्याच म्हणण्याची री ओढली.
त्याचवेळी डग्लसने आणखी भर घालून काढलेल्या त्याच्या बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया या पुस्तकात पुन्हा तोच लेख छापला। या एकूणच प्रयत्नांनी वातावरण चांगलेच तापले। मग टिळकांनी हा विषय हातात घेतला. त्यांनी केसरीत २३ एप्रिल १८९५ मध्ये एक सणसणीत लेख लिहिला. त्यात मराठी माणसाच्या निष्क्रियतेवर टीका करताना शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे लाभ उचलणार्या त्या पिढीतील सरदार, वतनदारांवरही चांगलीच झोड उठवली.
टिळकांच्या या लेखाने योग्य तो परिणाम साधला। आता लोकभावना चांगल्याच तापल्या होत्या. महाराजांच्या समाधीसाठी आता काही तरी ठोस केले पाहिजे ही भावना तयार झाली. मग त्यातून निधी उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्यातून रायगडावरील शिवकालीन साधनांची दुरूस्ती करून तेथे दरवर्षी महाराजांची जयंती साजरी करण्याचे ठरले. हा मुद्दा त्यावेळी एवढा पेटला की तो केवळ महाराष्ट्राचा राहिला नाही. एक तर आधीच ब्रिटिश अंमल असल्यामुळे छत्रपती शिवाजी हे आपोआपच राष्ट्रभक्तीचे प्रतीक बनले. मग काय पश्चिम बंगाल, आसाम संयुक्त प्रांत इकडेही शिवाजी महाराजांचे वारे पसरले. जणू एक राजकीय चळवळच तयार झाली.
टिळकांनी आता सर्व सूत्रे हाती घेतली। त्यांनी रानडेंप्रमाणेच ३० मे १८९५ मध्ये हिराबागेत बैठक घेतली. तीत एक स्मारक समिती स्थापन करण्यात आली. पन्नास सदस्यांच्या या समितीत स्वतः टिळकही होते. वास्तविक त्यावेळी सरकारही समाधीच्या दुरूस्तीसाठी पैसे देत होते. पण ती रक्कम होती वर्षाला पाच रूपये. मराठा साम्राज्याची निर्मिती करणार्या छत्रपतीच्या वाट्याला ही अवस्था यावी? टिळकांनी या बैठकीत सगळ्यांनाच चांगले खड़सावले. ही बाब आपल्याला शोभनीय नाही, हे त्यांनी लक्षात आणून दिले आणि ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून निधी उभारण्याचे ठरले. अगदी एका विद्यार्थ्याकडून मिळालेले दोन आणे ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळालेले एक हजार रूपये अशा प्रकारे निधीची उभारणी सुरू झाली. अवघ्या सहा मिहन्यात नऊ हजार रूपये जमले.
लोकांच्या या प्रतिसादाने सर्वच जण भारावून गेले। एवढा प्रतिसाद सर्वस्वी अनपेक्षित होता. मग त्याचवेळी हाही निर्णय घेण्यात आला की शिवजयंती आता उत्साहात आणि दणक्यात साजरी करण्यात यावी. पूर्वी ती रायगडाखाली महाडला साजरी व्हायची. यानंतर मात्र, ती रायगडावरच साजरी करण्याचे ठरले. त्यासाठी नियमावलीही करण्यात आली.
अर्थात शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी ब्रिटिशांनी सहजासहजी परवानगी दिली नाही। सुरवातीला मागणीच फेटाळण्यात आली. कारण काय तर रायगड हा जंगल भाग आहे, म्हणून. दुसर्या वेळेला यात्रा असा उल्लेख होता, म्हणून. मग उत्सव असा शब्द टाकल्यानंतर एकदाची परवानगी मिळाली. त्यासाठी टिळकांना फार यातायात करावी लागली. महाबळेश्वरमध्ये सुटीवर असलेल्या ब्रिटिश गव्हर्नरला जाऊन ते भेटले. उत्सवावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची हमी त्यांना दिली. त्यानंतर मग ही परवानगी मिळाली.
एवडे सव्यापसव्य करूनही पहिली सार्वजनिक शिवजयंती दणक्यात साजरी झाली। २१ एप्रिल १८९६ च्या केसरीत छापलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून आलेले तब्बल सहा हजार लोक उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर रायगडावर झालेला सर्वांत मोठा कार्यक्रम हाच ठरला. कारण मधल्या काळात कोणताही एवढा मोठा कार्यक्रम रायगडावर झाला नव्हता. टिळकांच्या या प्रयत्नाने 'रायगडाला पुन्हा एकदा जाग आली'. हिंदवी स्वराज्य उभारणार्या छत्रपतींचा तेजस्वी इतिहास रायगड पुन्हा एकदा दिमाखात सांगू लागला....
सौजन्या - अभिनय कुलकर्णी
Friday, 30 January 2009
नेताजी पालकर
नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते। त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.
पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.[स्रोत- वरील सर्व माहिती राजा शिवछत्रपति (लेखक- बाबासाहेब पुरंदरे) आणि छावा (लेखक- शिवाजी सावंत) या दोन ग्रंथानमधून घेतलेली आहे.]
बाजीराव पेशवे - सारांश.
पहील्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवुन दिले. शनिवारवाड्या बद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठीकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट कील्लाच बांधुन घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालुन येणारे ’शिकारीकुत्रे’ खरच स्वराज्याला घाबरु लागले.
दिल्लीचा वजिर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालुन आला। तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली। बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकालेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपुर उतरले होते। त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले। मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवुन त्याने हेरां मार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालुन गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द बंदीस्त वजिरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानि" बाजिरावास दिली, जेणेकरुन बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतिल.
या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासुन बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडुन समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधुन घेतला.चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखिल कोकण घाट आणि कीनार्यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला.बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाउ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडुन ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकुन घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणिव ठेवुन चिमाजीने वसई जवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकुन मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडुन, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फुट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे जगातील एकमेव अपराजित सेनापती होते.
Tuesday, 27 January 2009
महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला?
िवचरित्राचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते। याच प्रस्तावनेत कुरुंदकरांनी महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला ते सांगितले आहे. तो भाग या प्रस्तावनेतून जसाच्या तसा... ................................... इ. स. १६७४ ला शिवाजीने स्वतःला राज्याभिषेक करण्यासाठी हजार प्रयत्न करून, आपले क्षत्रियत्व त्याने सिद्ध केले. मुंज केली. प्रायश्चित्तं घेतली. स्वतःच्या पत्निंशीच नव्याने लग्ने केली. अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला. माझे म्हणणे असे की, तो काळ धार्मिक प्रभाव आणइ वर्चस्वाचा काळ आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेकाला पावित्र्य आणि प्रतिष्ठा आहे. राज म्हणजे मुसलमान, ही त्यावेळची समजूत आहे. दिल्लीपती हा सर्व भारताचा स्वयंभू सम्राट मानला जाई. यामुळे बहामनी घराणे वैभवात असतानाही जनतेला व खुद्द बहामनी वजीरांना आपल्या राज्याचा सम्राट दिल्लीपती व त्याचा अधिपती इराणच खलीफा वाटे. भारताचे अधिपत्य मिळाल्यानंतरही हे अधिपत्य इराणकडून मान्य करून घेणे अल्लाउद्दिनला इष्ट वाटले. औरंगजेबाच्या वेळी खलीफा तुर्की होता. त्याची मान्यता आपल्या अधिपत्याला मिळावी याचा अटोकाट प्रयत्न अलमगीरने केला. शेवटी ती मिळाली तेव्हा, आनंदोत्सव दरबार केला. आदिलशाही, कुतुबशाही, राजांना व सरदारांनासुद्धा दिल्लीपती हा आपल्या पादशाहीचा सम्राट वाटे. शिवाजीच्या वेळी अनेक रजपूत राजे होते. त्यांचे मंचकारोहण होई व तख्तनशीनीचा समारंभही होई. राज्याभिषेक नव्हता. विजयनगरचे साम्राज्य स्थापन झाले. वैभवाला चढले. पण वैदिक विधिपूर्वक राज्याभिषेक नाही. इ. स. १००० च्या नंतर हा वैदिक विधीच लुप्त झाला होता. गागाभट्टाने धर्मग्रंथ पाहून तो नव्याने सिद्ध केला व शिवाजीला राज्याभिषेक केला. ही एक क्रांतिकारक घटना होती. एकीकडे राम, नल, युधिष्ठिर, विक्रमादित्य या परंपरेशी या कृतीने शिवाजी आपला सांधा जोडीत होता. दुसरीकडे अखिल भारतातील हिंदुंच्या धर्मनिष्ठा व धर्माचे सारे पूज्यत्व व पावित्र्य स्वतःमागे उभे करीत होता. आमच्या धर्मशास्त्राप्रमाणे सत्य युगात चार वर्ण असतात. द्वापारयुगात वर्णसंकराला आरंभ होतो. त्रेतायुगात तीन वर्ण राहून संकर वाढतो. कलीयुगात ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण राहतात. आमच्या पुराणांप्रमाणे नंद घराणे संपले आणि क्षत्रिय संपले. तिथून पुढे शूद्रराजे आरंभ झाले. शिवाजी जणू इतिहासाचे चाक मुस्लीम पूर्व जागेपर्यंत मागे सरकवून हिंदुंच्या वेदपुराणांचा, स्मृतींचा व सर्व हिंदू वैभवाचा स्वतःशी सांधा जोडून नवे युग सुरू झाल्याची द्वाही फिरवू इच्छित होता. शिवराज्याभिषेकाकडे तात्कालिक सोयीचा भाग म्हणून न पाहता, त्या मागची भव्यता समजून घेतली पाहिजे. अभिषेक-विधी बेंद्रे यांनी संपादन केला आहे. आपण आपल्या कादंबरीत या प्रसंगाची सर्व भव्य पवित्र भूमिका ठसठशीतपणे मांडावी असे मला वाटते. स्वतःला वैदिक मंत्रांनी अभिषिक्त करून घेण्याची कल्पना शिवाजीच्या मनात केव्हापासून आली असावी ? मला वाटते, ती फार पूर्वीपासून असावी. कारण त्याने प्रधानाचा शिक्का असा घेतला आहे - शिवनगरपती हर्ष निधान सामराज मतीमत् प्रधान. हा शिक्का १६५३ पासूनचा आहे. यातील हर्षनिधान या विशेषणाला संस्कृत काव्य वाड्मयाची पार्श्वभूमी आहे. अभिषिक्त राजा म्हणजे सर्वांस अभय व न्यायाची हमी, प्रजेच्या नियमांची व सुखाची हमी. मात्सन्यायातील दुःखांपासून प्रजेची सुटका, अशी वर्णने कौटिल्यापासून आहेत. काव्यातही आहेत. अर्थात हे एक माझे अनुमान.
महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार
ते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले। महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी... सिद्दी हिलाल घोडदळातील सेनापती सहाय्यक पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले। उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले. सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र) घोडदळातील सरदार सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद. सिद्दी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली. सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले. नूरखान बेग स्वराज्याचा पहिला सरनोबत २१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली. मदारी मेहतर विश्वासू सेवक आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत. काझी हैदर शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव १६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले. खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले. शमाखान सरदार कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली. सिद्दी अंबर वहाब हवालदार जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला हुसेनखान मियाना लष्करातील अधिकारी मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला. बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले. रुस्तमेजनमा शिवाजी महाराजांचा खास मित्र विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले. हुबळीच्या लुटीत कामगिरी (६ जानेवारी १६६५) चोख पार पाडली. नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली. सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले. दर्यासारंग आरमाराचा पहिला सुभेदार खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला. बसनूर ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले. इब्राहीम खान आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला. दौलतखान आरमाराचा प्रमुख (सुभेदार) उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०) खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८) सिद्दी संबुळचा पराभव (४ एप्रिल १६७४) सिद्दी मिस्त्री आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला. सुलतान खान आरमाराचा सुभेदार शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार. दाऊतखान आरमाराचा सुभेदार अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला. सुलतान खान नंतर सुभेदार झाला. पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला. इब्राहिम खान तोफखान्याचा प्रमुख स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख. डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण पायदळ आणि घोडदळ १६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही. घोडदळातील चार मोगली पथके घोडदळातील सरदार आणि सैनिक मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.
(प्रेम हनवते यांच्या 'शिवरायांच्या निष्ठावंत मुस्लिम सैनिक' या पुस्तकामधून...)
Friday, 23 January 2009
बाळाजी विश्वनाथ
महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष। त्यास नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. घराणं देशमुखीचं असल्याने बाळजीनानास मोडीवाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण मिळालं. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर मुरुड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवुन एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवी्स-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मुघलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्याच्या खुनाचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखित बसला आणि कटवाल्यांकडुन मारला गेला. स्वामीनिष्ठेची हि पराकाष्ठाच होती.
बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले। त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वत: अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. महाराष्ट्राचा छत्रपती त्याने हाल-हाल करुन मारला होता. अशाच अस्मानि-सुल्तानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होतं. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळुन सगळ अनुभवत होता. १७०५ च्या दरम्यान त्याने देखिल आपली समशेर गाजवली आणि बहुतेक ती जस्तच परजली असावी कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली होती, आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखिल मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"
छ। राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६ वर्षे मराठी सत्ता औरंग्याशी झुंजत होती. सातारा, परळी, सिंहगड, पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर त्याने त्या काळी २ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला. १७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणुन प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडीत" म्हणजेच बाळाजी गेला होता. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कामी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्या संबधीचे पत्र त्याने "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहीलेले आढळते.
औरंगजेबाच्या मृत्युपश्चात शाहु महाराजांची सुटका झाली. या वेळी बाळाजीने शाहूंचा पक्ष घेतला. अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वत:च्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहुंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजु शकतील हे आंग्र्यांना बाळाजीनेच पटवुन त्यांना शाहुंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधू बरोबर तह घडवुन आणला, मग त्यांच्याच सहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करुन रफिउद्दौरजात याला गादिवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहुच्या पत्नींची सुटका करवुन घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडु नये म्हणुन बाळजीने केलेली राजकारणे भल्याभयांच्या मतीला गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्द सामर्थ्यावर घडवुन आणले होते हे महत्वाचे. १७०७ पासुन पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्युपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले, अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.
राजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...
शिवछत्रपती महाराजानी जीवन भर एकच वसा पेलला तो म्हणजे माणूस जोड्न्याचा ॥मराठयानी इतिहास घडविला परन्तु मराठयानी इतिहास लिहला नाही ।शिवाजिनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर ... निष्ठा माणस कशाच्या मोहने शिवाजी कडे आली....विश्वास दिला राज्यानी " आपल राज्य उभा करायचा " मला छत्रपती व्हायच म्हणून नाही ....तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे..ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती .... हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यानकडे होता.रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली ...शिवाजी महाराज स्वारी वर गेले...हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला .. आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीने तर जबाबदारी टाकली आहे . किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले.आपला राहता वाडा , आपली जमिन विकली. बायकोसह रायगडावर आला.. पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली .....
शिवाजीना आल्यावर कळल हिरोजिने काय केले । राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ॥राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी म्हणाले, " हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय." त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान ज़ुकवुन म्हणाला ," महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय...." महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे ..रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच्या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया . महाराजाना कलेना हे कसल मागण॥पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ...मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ...????आणि हिरोंजी उत्तर देतात, " राजे..! ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल,त्या- त्या वेळी जगदिशवराच्या दर्शनाला तुम्ही याल... ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल.."राजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...
हिंदूपतपातशाहीतील संक्रांतिची भयाण आठवण
--ओमकार
Monday, 24 November 2008
जाणता राजा
शिवरायाचा आठवावा प्रताप ! या भुमंद्ली !! १ !!
शिवराजाचे कैसे बोलने ! शिवराजाचे कैसे चालने !
शिवराजाचे सलगी देणे ! कैसे आसे !! २ !!
सकल सुखांचा केला त्याग ! करुनी साधिजे योग !
राज्य साधनेची लगबग ! कैसी केली !! ३ !!
त्याहुनी करावे विशेष ! तरीच म्हनावावे पुरुष !
या उपरी आता विशेष ! काय बोलावे !!!!!!!!
शिवरायांचा पाळणा:-
हा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटकाहा
असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा
इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २